मा मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील महिन्यात जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर आता लगेच दुसरा पुरस्कार. सेवागिरी कृषिरत्न पुरस्कार माजी जलसंपदा मंत्री, मा. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पुसेगाव येथील कृषी प्रदर्शनामध्ये वितरीत करण्यात आला. यावेळी सेवागिरी देवस्थान चे अनेक पदाधिकारी तसेच शेतीमधील अनेक अधिकारी उपस्थित होते. शेती आणि शेतीमधील उत्पादित मालावर करत असलेल्या प्रक्रिया उद्योगामुळे अनेक जणांना रोजगार तसेच अनेक तरुणांना नवीन प्रयोग करण्याची संधी यातून मिळत आहे. आपणास मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.
डॉ. श्रीधर पवार
९४०४४०५७०६

