fbpx
Select Page

ग्रामीण आरोग्य- आपली खाद्यसंस्कृती  आणि पचनशक्ती / पचनक्रिया

       आपले आरोग्य हे आपल्या पचनशक्तीवर अवलंबून असते. पचनशक्ती जेवढी चांगली तेवढे आपले आरोग्य चांगले, शरीर निरोगी आणि बळकट असते. अनेक आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्याचे काम आपली चांगली पचनशक्ती करत असते. हेच उलट विचार केला तर – पचनशक्ती चांगली नसणे हे अनेक आजारांना आमंत्रण देण्याचे काम करते.

       खाद्य संस्कुती / आहार आणि पचनशक्ती हे एकमेकांशी जोडलेले आहे. ग्रामीण भागातील खाद्य संस्कृती बाबत बोलायचे झाले तर फार पूर्वीपासून सर्वांच्या आहारामध्ये दुध, तूप, दुधाचे पदार्थ, ताज्या भाज्या यांचा समावेश होता आणि आतादेखील आहे. सर्व प्रकारची कडधान्ये आहारात होती, अनेक रानभाज्या, निसर्गात वेगवेगळ्या ऋतूमध्ये मुबलक असणारे भाजी – फळे यांचा समावेश होता त्यामुळे शरीरात वाढणाऱ्या दुषित घटक आपोआप शरीरातून बाहेर टाकले जात होते. आहारात वाढलेल्या पित्त दोषाचे संतुलन करण्याचे काम तुपामुळे आपोआप घडत आले आहे. जेवणात तूप घेण्यासोबतच जेवण गरम गरम म्हणजे “तव्यामधून ताटामध्ये” असे असल्याने पचन होण्यास सोपे होते. शिळे पदार्थ खाणे हि आपली संस्कृती नाही परंतु आताच्या काळामध्ये फ्रोझन फूड, बेकरीचे पदार्थ, अनेक आंबवलेले पदार्थ, मद्यपान याचे प्रमाण वाढल्याने अनेक आजार उद्भवत आहेत.

        पूर्वीपासून ग्रामीण भागातील लोक हे जास्त शारीरिक कष्ट करत आले आहेत. त्यामुळे त्यांचा आहार हा सामान्य माणसांपेक्षा जास्त असतो. ग्रामीण भागातील लोक घेत असलेला आहार सर्व प्रकारच्या भाजीपाला युक्त गरम व तुपाची धार सोडलेला असल्याने आजारांना आपोआपच दूर ठेवण्याचे काम घडत होते. जे अन्नधान्य शेतामध्ये उत्पादित केले जात होते ते पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने करत असल्याने त्यामध्ये असणारे पोषक मूल्यांचे प्रमाण हे जास्त असल्याने त्यामुळे अनेक आजारांना दूर ठेवले जात होते.

         सध्याच्या काळात बदलत असलेली जीवनपद्धतीमुळे आहार – विहार आणि आचार यांच्या सवयी बदलल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून शरीर अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासले जात आहे. यामध्ये वातावरण बदलासोबत दिनचर्या, अवेळी जेवण, जागरण, फास्टफूड चा अति प्रमाणात आहारामध्ये समावेश झाल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण आपोआपच मिळत आहे. काळानुसार आपल्याला बदलायला हवे परंतु ते बदल आपण काश्यामध्ये करत आहोत त्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. पर्यटन, प्रवास यामुळे बाहेरील – हॉटेलमधील आहार सेवन करणे गरजेचे होते परंतु त्याचा अतिरेक नको.

कोरोना लॉकडाऊन  आणि आहाराचा  स्वैराचार

२०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोना ने हादरवून सोडले होते, मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक जणांनी स्वता मधला खवय्या जागा झाला आणि अनेक नवनवीन पदार्थ बनवायला सुरवात केली. यामध्ये अनेक फास्टफूड, तळलेले चमचमीत पदार्थ, मांसाहार, बेकरीचे पदार्थ भरपूर प्रमाणात आहारात आले. मार्च महिन्यापासून आहारात घेतल्या समावेश झालेल्या गोष्टींचा परिणाम सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली. अनेकांना सर्व त्वचेला खाज येणे, त्वचेवर चट्टे उठणे, अंगावर गांधी – पुरळ उठणे, छातीत जळजळ, मुळव्याध , संडासवाटे रक्त पडणे, पोटात दुखणे, पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे अश्या प्रकारचा त्रास अनेक लोकांना होत असलेला पाहायला मिळाले. आहार केल्यानंतर लगेच कोणताही त्रास झाला नसला तरी पुन्हा त्रास होणारच नाही असे म्हणू शकत नाही. काही कालावधी नंतर त्रास होत असलेला या लॉकडाऊन मध्ये दिसायला मिळाले. त्यामुळे कोणतीही गोष्ट सेवन करताना त्याचा आपल्या शरीरावर लगेच कोणारा परिणाम आणि काही कालावधी नंतर होणारे परिणाम याचा विचार आधी केला पाहिजे. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा शरीरावर कमी अधिक कालावधी नंतर घडून येतोच.

पचनशक्ती बिघडण्याची कारणे-

आहारामध्ये अति तिखट – तेलकट पदार्थांचा समावेश, अति प्रमाणात मांसाहार, फास्टफूड, जेवणात मिठाचा समावेश या सर्व गोष्ठीचा अति पप्रमाणात समावेश असणे, भूक लागली नसताना जेवण करणे, अति चहा- कॉफी किंवा थंड पेयांचा समावेश. शिळे पदार्थ, अति प्रमाणात पाणी पिणे. या सर्व गोष्ठीमुळे पचनक्रिया बिघडण्यास सुरुवात होते.

विहारमध्ये- अवेळी जेवण करणे, जेवण केल्यानंतर लगेच झोपणे, व्यायाम न करणे. अति जागरण, मल- मूत्र वेग आले असताना ते रोखून ठेवणे.

पचनशक्ती / पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी –

आहारामध्ये – भूक लागल्यावर आवश्यक आहे तेवढाच आहार घ्यावा. जेवणात नेहमी तुपाचा समावेश असावा. जेवण गरम गरम घ्यावे. आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये याचा समावेश असावा.  

विहारमध्ये – नियमित व्यायाम करणे गाजेचे आहे, जेवण केल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी शतपावली केल्याने जेवण पचायला मदत होते.  

आरोग्य सल्ला

भूक लागत नसल्यास सुंठ किंवा आले पावडर पाण्यामध्ये / दुधामध्ये उकळून गरम गरम प्यावे. यामुळे भूक लागण्यास मदत होते.

× How can I help you?