पावसाळा – मणक्याचे आजार / सांध्यांचे आजार – पंचकर्म बस्ती उपचार
भाग 1
पावसाळा आला की हे सगळे आजार आणि या आजाराची लक्षणे ही वाढलेली दिसून येतात .
सगळ्यांना नेहमी सतावणारा असा आजार म्हणजे सांधे दुःखी, त्यामध्ये महिलांना तर यातून सुट्टी मिळणे अवगढच असते. कंबर दुखणं, मान दुखी, गुडघे दुखी किंवा इतर सांधे याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत .
मणक्याचे किंवा सांध्यांचे आजार होण्याची कारणे याबाबत आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत .
आहार
शिळे पदार्थ, दही, आंबवलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, मिरची, मसालेदार पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, लोणचे, पापड. मिल्क शेक, दूध आणि फळ एकत्र करून खाणे, शिकरण. अति उपवास, अवेळी जेवण .
विहार
अल्प झोप – अति जागरण .
अति प्रमाणात व्यायाम ताकतीपेक्षा जास्त.
अति व्यवाय – नियम सोडून मैथुन करणे .
अतिशय काम / श्रम करणे .
अतिशय पायी चालणे .
वेड्या वाकड्या हालचाली करणे .
मलमूत्रादी वेग रोखणे . यामध्ये लघवीला किंवा संडासला आले असता न जाणे .
मलमूत्रादि वेग आले नसताना ते निर्माण करणे .
अतिशय वजनदार वस्तू डोक्यावरून किंवा खांद्यावरून नेणे.
अतिअध्यायन – एकाच स्थितीमध्ये – एकाच ठिकाणी खूप वेळ बसणे.
अतिशय मोठ्याने बोलणे . मानेच्या आजाराशी निगडित .
अतिशय वेगात धावणे.
खड्यावरून / लांब किंवा उंचीवरून उड्या मारणे .
उड्या मारत चालणे .
अति प्रमाणात पोहणे .
वाहनावरून गाडी वरून अति प्रमाणात प्रवास
अति प्रमाणात पायी चालणे .
मानसिक –
अति प्रमाणात चिंता, शोक, क्रोध, भय, काम, अति त्रास.
काळ –
पावसाळा, पावसाळा ऋतू शिवाय आकाशात ढग आल्यास .
आघात
उंचीवरून, गाडीवरून पडणे.
सांधे , हाड मोडणे.
अति दाब पडणे किंवा दाबले जाणे.
मार लागणे .
भाग 2 मध्ये यामध्ये दिसणारी लक्षणे आणि तपासण्या याबाबत माहिती घेणार आहोत .
आरोग्याविषयीचे व्हिडीओ पाहण्यासाठी YouTube Channel लिंक –
https://www.youtube.com/@DrShridharPawar
आरोग्यवेल आयुर्वेद फेसबुक पेज .
https://www.facebook.com/ArogyavelAyurved
आरोग्यवेल आयुर्वेद इंस्ताग्राम पेज .